शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे, असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे, असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणताही संभ्रम नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्ष मजबुतीने शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे व त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, भाजपाच्या विरोधात जे पक्ष लढण्यासाठी एकत्र येतील त्यांना सोबत घेऊन लढू, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचाः गणपती बाप्पा मोरया! चिपी विमानतळावरून ‘या’ तारखेपासून नियमित प्रवासी विमानसेवा होणार सुरू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा