शरद पवार विरोधी पक्षाच्या आघाडीचे महत्वाचे स्तंभ आहेत. शरद पवारांचा राजीनामा हा व्यक्तीगत विषय असू शकत नाही. आपण राजकारणात असून, आपलं विरोधी पक्षांचं राजकारण आहे. आपली लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत शरद पवारांनी पक्षाचं नेतृत्व करावं, अशी अपेक्षा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

“आपली लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. अशावेळी आपले स्तंभ उभे केले पाहिजेत. आपला पक्ष टिकवता आला पाहिजे. शरद पवारांच्या नावाभोवती राष्ट्रवादी पक्ष उभा आहे,” असे संजय राऊतांनी म्हटलं.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Aditya Thackeray cricket
ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

हेही वाचा : “राजकारणात अपघाताने काहीच होत नाही, जर…”, राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच संजय राऊतांचं सूचक ट्वीट

“शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आला होता. लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव यांचा पक्ष त्यांच्या नावावर उभा आहे. लोकसभेची निवडणूक होईपर्यंत शरद पवारांनी नेतृत्व करावं. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा पक्षाच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केली होती. पण, आज शरद पवारांची गरज आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : “शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर…”; राष्ट्रवादीतील घडामोडींबाबत एकनाथ खडसेंचं विधान!

“शरद पवारांची भूमिका युवक आणि महिलांना राजकारणात स्थान देण्याची आहे. मात्र, देशाची राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची आणि अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे देशातील नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे,” असा सल्ला संजय राऊतांनी विरोधी पक्षाला दिला आहे.