Sharad Pawar Political Future: पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानं जोरदार मुसंडी मारली. लढवलेल्या १० जागांपैकी तब्बल ८ जागा त्यांनी जिंकून आणल्या. महाविकास आघाडीनं महायुतीला थेट १७ जागांपर्यंत मागे ढकललं. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र मविआला ही विजयी आगेकूच कायम राखता आली नाही. २८८ पैकी त्यांना अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं, तर महायुतीनं थेट २३५ जागांसह सत्तेवर दावा केला. या सगळ्यामध्ये शरद पवारांना अवघ्या १० विधानसभा जागाच जिंकता आल्या. त्यातून चर्चा सुरू झाली ती शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची!

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी ८७ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यातल्या तब्बल ७७ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापैकी बहुतांश ठिकाणी त्यांचा सामना थेट अजित पवार गटाशी होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अजित पवार शरद पवारांवर भारी पडल्याचं दिसून आलं. अजित पवारांनी यंदा ४१ जागा जिंकवून आणल्या. त्यामुळे आधी पक्ष, पक्षाचं चिन्ह आणि आता महाराष्ट्रातलं व्यापक जनमतदेखील अजित पवारांनी शरद पवारांकडून स्वत:कडे वळवल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांची पुढची वाटचाल काय असेल? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.

guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

शरद पवार व उद्धव ठाकरे सत्तेत गेलेल्या गटांशी हातमिळवणी करतील असा एक तर्क लावला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणूनच पुढे वाटचाल करतील असं म्हटलं जातंय. त्याशिवाय आता उद्धव ठाकरे गट व काँग्रेसमधून स्वतंत्र लढण्याचा सूरही उमटू लागला आहे. यात शरद पवारांचा पक्ष मात्र मौन बाळगून आहे. शरद पवार कधी काय खेळी करतील? याविषयी अंदाज बांधणं कठीण असल्याचं त्यांच्याबाबत बोललं जातं. पण यंदा त्यांच्यासमोरचं आव्हान कठीण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

पालिका निवडणुकांची संधी!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे विधानसभा निवडणुकीत गेलेली पत पुन्हा मिळवण्याची एकमेव संधी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. २०१४ ते २०१८ या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या २७ महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये तेव्हाच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला ६.९५ टक्के मतं मिळाली. पण त्याचवेळी निमशहरी व ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव दिसून आला. इथे पक्षाला अनुक्रमे १५ आणि २१ टक्के मतं मिळाली. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षफुटीनंतर ही मतं कशी विभागली जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मी शांत बसणार नाही – शरद पवार

विधासभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले. “मी शांत बसून राहणार नाही. मी लोकांना भेटत राहणार आणि त्यांच्या समस्या सोडवत राहणार”, असं ते म्हणाले. आपल्या विचारसरणीवर चालणारी नवी पिढी घडवण्यावर आपला भर असणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. शरद पवारांचे निकटवर्ती व पक्षाचे सरचिटणीस जयदेव गायकवाड यांनी पक्षाला आता एका नियोजित धोरणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. पण त्याचवेळी विधानसभा निवडणुकांना बसलेला फटका मोठा नसून पक्ष आपला लढा चालूच ठेवेल, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन आम्हाला मिळालं होतं, पण…”, ईव्हीएमबाबत शरद पवारांचं मोठं विधान

“शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत ज्यांना जे म्हणायचंय, ते म्हणू देत. शरद पवार त्यांच्या विचारसरणीसाठी लढा देण्यावर ठाम आहेत”, असं गायकवाड म्हणाले. भाजपाच्या हिंदुत्वाच्या धोरणाच्या उत्तरादाखल शरद पवारांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर विश्वास दाखवल्याचं मानलं जातं.

पुढच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, शरद पवारांच्या वयामुळे पुढच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीवेळी ते राजकारणात आजच्याइतकेच कार्यरत असतील का? याबाबत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. “शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे ते पुढील निवडणुकीत एवढेच कार्यरत असण्याची शक्यता कमी आहे”, असं त्यांनी नमूद केलं आहे. शरद पवारांकडे अजूनही १० आमदार आणि ८ खासदार आहेत. त्याशिवाय पक्षातील इतर नेत्यांची फळी व त्या त्या मतदारसंघातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या मतांनिशी पराभूत झालेले उमेदवारही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळ जोपर्यंत त्यांच्यासोबत ही आकड्यांची ताकद आहे, तोपर्यंत त्यांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही, असं मानलं जातं.

“आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार थेट सहभागी नसले, तरी ते पक्षाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील आणि पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मदत करतील”, असं जयदेव गायकवाड यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे शरद पवार पुढच्या काळातही कार्यरत असतील, असेच सूतोवाच त्यांनी दिले आहेत.

पुढच्या नेतृत्वाचा प्रश्न!

शरद पवारांना पक्षाच्या उभारणीसोबतच आणखी एका महत्त्वाच्या आव्हानाचा सामना करावा लागेल तो म्हणजे पक्षाचं पुढचं नेतृत्व ठरवणं. इंडियन एक्स्प्रेसनं पक्षातील सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवारांना पक्षाची सूत्रं सोपवण्यासाठी राज्यात तसा नेतृत्वाचा पर्याय नाही. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या राजकारणात आल्यापासून म्हणजेच २००६ पासून खासदार आहेत. त्यांचं राजकारण प्रामुख्याने दिल्लीभोवतीच फिरतं राहिलं आहे. त्याव्यतिरिक्त रोहित पवार यांना या निवडणुकीत १२४३ मतांनी अगदी निसटता विजय मिळाला, तर युगेंद्र पवार अजित पवारांविरोधात एक लाखाहून अधिक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे पक्षात पुढच्या काळातही कार्यरत राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचं बोललं जात आहे.

निवृत्तीचे दिले होते संकेत, पण…

दरम्यान, मतदानाच्या आधी शरद पवारांनी एका सभेत बोलताना राजकीय कारकि‍र्दीतून निवृत्तीचे संकेत दिले होते. “मी आता निवडणुका लढवणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. आता मी आत्ताची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा राज्यसभेतही जायचं की नाही याचा विचार करतोय”, असं शरद पवार म्हणाले होते. पण विरोधाभास असा की आता लागलेल्या निकालांनंतर शरद पवारांना पुन्हा राज्यसभेत पाठवणं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला कठीण जाऊ शकतं. पण त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीत दिल्लीत आपलं स्थान अजून काही काळ कायम ठेवण्याकडे शरद पवारांचा कल असू शकतो.

Story img Loader