Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षातील नेत्याने एक मोठा दावा केला आहे. एक मोठा मासा म्हणजेच महायुतीतला दिग्गज नेता आमच्या पक्षात येणार आहे. शरद पवारांच्या पक्षातील जयंत पाटील हे विधान कुणाला उद्देशून केलं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसंच महायुतीला फारसं यश आगामी विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

जयंत पाटील काय म्हणाले?

या दाव्यानंतर तो तो बडा नेता कोण? हा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले “योग्य वेळ आली की आम्ही ते तुम्हाला सांगू.” जयंत पाटील यांनी महायुतीच्या जागांबाबतही भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला १०० हून कमी जागा मिळतील. महाविकास आघाडी विजयी होईल” गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ( Sharad Pawar ) गटात प्रवेश केला. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती तुतारी घेतली. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते. त्यातच, शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसे संकेतही दिले आहेत.

Ajit pawar wanted to become chief minister
Ajit Pawar : “मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण…” अजित पवारांचं मोठं विधान; खंत व्यक्त करत म्हणाले…
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “हे एन्काउंटर असू शकत नाही”, अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे!
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
vijay wadettivar
“…मग ब्रिजभूषण सिंह यांचे एन्काऊंटर का केले नाही?”; अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं पुन्हा शिंदे सरकारवर टीकास्र!

हे पण वाचा- “शरद पवार आमचेे दैवत”, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटलांची खोचक प्रतिक्रिया | Jayant Patil

शरद पवार काय म्हणाले?

सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही ४०० पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले? राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले”, असे म्हणत शरद पवारांनी ( Sharad Pawar ) थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

सरकार बदलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आता फक्त दोन महिने राहिले आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी धनंजय मुंडेंबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांच्या जोरदार टीकाही केली होती. आता, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवारांनी ( Sharad Pawar ) परळीत विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतं आहे.