Sharad Pawar NCP vs Dhananjay Munde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात ३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. मतदानामुळे राज्यभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, सरकारला व पोलिसांना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळालेलं नाही. नाशिकमधील विद्यमान आमदार सुहास कांदे व अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यातील हमरीतुमरीपाठोपाठ परळीमधून (बीड) एक संतापजनक घटना समोर आली आहे. समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ परळीतील एका मतदान केंद्राबाहेरचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओत काही लोकांची टोळी एका तरुणाला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यासह दावा केला आहे की, मारहाण करणारे लोक भाजपाचे कार्यकर्ते व धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत. तसेच ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील (शरद पवार) पदाधिकारी आहे.
VIDEO : धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या शिलेदाराला मारहाण? राष्ट्रवादीकडून निषेध; टोळीने आले अन्…
Sharad Pawar NCP : हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-11-2024 at 16:07 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSधनंजय मुंडेDhananjay Mundeनिवडणूक २०२४Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar ncp shared video claims dhananjay munde bjp workers beat beed youth parli assembly 2024 asc