Sharad Pawar : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर १३ ऑगस्टला लैंगिक अत्याचार झाला. त्यानंतर २० ऑगस्टला या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले. बदलापूरमध्ये झालेला हा जनक्षोभ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं त्यात बदलापूरचे लोक कमी होते आणि बाहेरुन लोक आणले होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला होता. या आरोपाला शरद पवारांनी ( Sharad Pawar ) उत्तर दिलं आहे. तसंच महाराष्ट्र बंद का करण्यात येतो आहे ती भूमिकाही स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शरद पवार?

बदलापूरमध्ये दोन अजाण बालिकांवर शैक्षणिक संस्थेच्या आवारात अत्याचार होतो ही गोष्ट प्रचंड धक्कायक आहे. साहजिकच त्याची प्रतिक्रिया उमटलेली आपण पाहिली. बदलापूरमध्ये झालेला प्रकार धक्कादायक आहे त्या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारने अशा प्रसंगानांना सामोरं जाण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

जनतेच्या मनात काय आहे ते लोकांपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र बंद

शरद पवार पुढे म्हणाले, बदलापूरसारखी घटना घडते तेव्हा गृहखात्याची यंत्रणेने अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे. तसंच या प्रकरणात जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरपुरतं सीमित नव्हतं. मागच्या तीन ते चार दिवसात अशा घटना समोर आल्या आहेत. बालिकांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढतं आहे हे पाहण्यास मिळतं आहे. या प्रकरणांतून लोकांचा उद्रेक होतो आहे, राग व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून शांततापूर्ण बंद पुकारला आहे. लोकांची भावना सरकारपर्यंत पोहचली पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे, असं शरद पवारांनी ( Sharad Pawar ) स्पष्ट केलं.

महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन

महाराष्ट्र बंदमध्ये माझ्या पक्षाचे सगळे सहकारी सहभागी होतील. बंद शांततेत पार पडला पाहिजे आणि सामाजिक घटकांनी यात सहभागी झालं पाहिजे. तसंच राज्यात जे काही लाजिरवाणे प्रकार घडत आहेत त्यासंबंधी तीव्र भावना व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. महाराष्ट्रातली जनता मुलीबाळींच्या हितासाठी, सुरक्षेसाठी जनमत तयार करायला या बंदमध्ये सहभागी होतील आणि वेदना व्यक्त करतील असं शरद पवारांनी म्हटलं ( Sharad Pawar ) आहे.

हे पण वाचा- Badlapur Sexual Assault : “बदलापूर प्रकरणी एका महिला पोलिसाने शाळा प्रशासनाबरोबर..”, पीडितेच्या पालकांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री ते बोलले नसते तर फार बरं झालं असतं

बदलापूरमध्ये लोक कमी होते, आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असं मुख्यमंत्री म्हणाले. पण हे राजकीय होतं म्हणणं योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले नसते तर बरं झालं असतं. मला सांगा तिथे कुठला राजकीय पक्ष होता? हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा आणि भावना मांडण्यासाठीचा आहे. इथे कुणीही राजकारण आणलेलं नाही. आम्हा लोकांच्या मनातही नाही की अशा प्रकारे राजकीय हेतूने काहीतरी करावं. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करणं हाच हेतू आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे की याकडे तुम्ही जसं पाहता आहात तसं पाहू नये असं म्हणत शरद पवारांनी ( Sharad Pawar ) मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

शांततेच्या चौकटीत राहून जे करायचं आहे ते केलं पाहिजे

अत्याचाराच्या घटना थांबत नाही, वाढतं आहे असं दिसतं आहे. त्यासाठी समाजाला जागृत करावं लागेल, कुटुंबांना जागृत करावं लागेल. हे प्रकार घडू नयेत म्हणून जे जे करावं लागेल त्यासाठी शांततेच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जे करता येईल ते केलं पाहिजे असंही शरद पवार यांनी ( Sharad Pawar ) म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar news what did he says about badlapaur and what advise gave to cm scj