शरद पवारांना विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे अवघे १० आमदार जिंकले. त्यामुळे ते आता पुढे काय करणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे.
महाराष्ट्र विधानसभेत पराभूत झाल्यानंतर शरद पवारांची भूमिका काय? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Sharad Pawar News Update : पक्षात फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र दौऱ्याला निघालेल्या शरद पवारांची भूमिका विधानसभेच्या निकालानंतर काय असेल असा प्रश्न अवघ्या राज्याला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. तसंच, बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवारांना उभं केलं. प्रत्येक उमेदवारासाठी शरद पवारांनी सभा घेतल्या. परंतु, कालच्या निकालानंतर राष्ट्रवादीने केवळ दहाच जागा जिंकल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवारांची पुढची रणनीती काय यावर त्यांनी आज भाष्य केलं. कराड येथे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. हा पराभव स्वीकारला असून जनतेचा कौल आम्ही मान्य केला आहे, असं शरद पवार म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामती विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी होता. या जागेवरून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यांची लढत होती. गेल्या २० वर्षांपासून अजित पवार येथून आमदार आहेत. तर, युगेंद्र पवार या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकारणात सहभागी झाले. परंतु, त्यांच्यामागे शरद पवारांचं मोठं समर्थन होतं. त्यामुळे बारामतीची जनता अजित पवारांना साथ देईल की शरद पवारांना समर्थन देईल, यावर पवार कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि अजित पवार जवळपास एक लाख मताधिक्क्याने जिंकले. यावर शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले की अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊच शकत नाही.
शरद पवार म्हणाले की, “बारामतीमधून कोणालातरी उभं करणं गरजेचं होतं. कोणाला उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता? आम्हाला माहीत आहे की अजित पवारांची युगेंद्रशी तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांनी येथे बरीच वर्षे काम केलं आहे. सत्तेतील साथ हे एका बाजूला आणि नवखा तरूण उमेदवार एका बाजूला, त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही.”
मी घरी बसणार नाही
शरद पवारांनी आतापर्यंत आयुष्यात अनेक राजकीय वादळे झेलली आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार आले. पण प्रत्येकवेळी त्यांनी त्यावर मात केली आहे. या अनेक अनुभवांविषयी शरद पवार त्यांच्या अनेकविध भाषणांतही सांगत असतात. त्यामुळे आता वयाच्या ८४ व्या वर्षी आलेल्या अपयशामुळे शरद पवार पुढे काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. यावर ते म्हणाले, “निकाल काल लागला. आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता. पण मी काही घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभी करणं हा माझा कार्यक्रम राहील’, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ो
y
युगेंद्र पवारांचा पराभव मान्य?