ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
“सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे”
शरद पवार म्हणाले, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
“अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला”
“ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती,” असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: सिंधुताई मुख्यमंत्र्यांना फोन करुन म्हणाल्या होत्या, “उद्धवा महाराष्ट्र…”
“प्रिय सिंधुताई, तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु?”
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, “प्रिय सिंधुताई , तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु? तुम्ही केलेल्या अनाथ मुलांचे काम चिरंतन आहे. खुप प्रतिकुल अनुभव येईनही तुम्ही चैतन्य व प्रेमाची स्नेहगंगा होता.भरल्या अंतःकरणाने तुमचा निरोप घेते .तुम्हाला अखेरचा नमस्कार.”
माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला : यशोमती ठाकूर
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं.”
“अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी याच्यापासून उद्योगपतींपर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली. सिंधुताईंच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ९०० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तर केंद्र सरकारने त्यांना नुकताच मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झालाय. मी माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे,” अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नवाब मलिक (अलसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी)
रुपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग)
नारायण राणे (केंद्रीय मंत्री)
रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी)
जयंत पाटील (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र)
धनंजय मुंडे (सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र)
खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विनोद तावडे (भाजपा)
खासदार सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
याशिवाय अनेक राजकीय नेते, कलाकार आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली दिली आहे.