Sharad Pawar On Ajit Pawar : राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024 Result) निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. खरं तर लोकसभेसारखी विधानसभेची निवडणूक देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. मात्र, महायुतीने बहुमताचा आकडा सहज पार केला. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला फारसं यश मिळवता आलं नाही. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यात लढाई झाली. मात्र, या निवडणुकीत अजित पवार हे विजयी झाले तर युगेंद्र पवार यांचा पराभव झाला. यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या अपयशाबाबत आणि बारामतीत युगेंद्र पवार यांच्या पराभवाबाबत भाष्य केलं. याचवेळी अजित पवारांच्या विरोधात उमेदवार देण्याचं कारण काय होतं? हे देखील सांगितलं. अजित पवारांच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता तर काय झालं असतं? महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यामुळे कोणीतरी उमेदवार देणं गरजेचं होतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला जाणार का? शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे होतं. मग निवडणुकीत बारामतीत नेमकं काय घडलं? युगेंद्र पवार आणि अजित पवार अशी लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळाली. तसेच युगेंद्र पवार यांना लवकर लॉन्च करण्यात आलं असं वाटतं का? असे प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “असं नाही. बारामतीत कोणीतरी उभं करणं गरजेचं होतं. त्या मतदारसंघात माझा थेट संबंध येतो. समजा त्या मतदारसंघात उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता? त्यामुळे कोणीतरी उमेदवार देणं गरजेचं होतं. मात्र, अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांचं एवढ्या वर्षांत काम, सत्ता हे सर्व एका बाजूला आणि एक नवखा तरुण एका बाजूला होता. त्यामुळे आम्हाला याची कल्पना होती”, असंही शरद पवारांनी म्हटलं.

‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेचा फटका बसला?

विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. मात्र, याचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी बटेंगे तो कटेंगेमुळे आम्हाला फटका बसल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला. मात्र, त्या नाऱ्यामुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्याचा निश्चितच फरक पडला”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.