Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर आले. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, तर महायुतीला मोठं यश मिळालं. यानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार पुढील काही दिवसांत स्थापन होईल. सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र, या विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबाबत (Maharashtra Assembly Election 2024 Result) भाष्य केलं. तसेच यावेळी महाविकास आघाडीच्या अपयशाची काही कारणंही त्यांनी सांगितली. तसेच नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण आल्यास जाणार का? असा प्रश्न यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला. यावर शरद पवारांनी थेट बोलणं टाळत सूचक उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

महाविकास आघाडी कुठेतरी नियोजनात कमी पडली आहे का? भारतीय जनता पक्षाने प्रचाराचं सूक्ष्म नियोजन केलं होतं अशी चर्चा आहे. मग यामध्ये महाविकास आघाडी कुठे कमी पडली आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “आम्ही कोणीही त्यामध्ये लक्ष घातलेलं नव्हतं. मी स्वत: देखील लक्ष घातलेलं नव्हतं. त्यामुळे यामधून काही फरक पडला की नाही? याबाबत मला कल्पना नाही”, असं शरद पवार म्हणाले.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा

हेही वाचा : विधानसभेत ‘मविआ’ला अपयश का आलं? शरद पवारांनी सांगितली तीन मोठी कारणं; म्हणाले, “बटेंगे तो कटेंगे…”

शपथविधी सोहळ्याला जाणार का?

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल. सध्या महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. तसेच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीमधील पक्षातील कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? अशा अनेक प्रश्नांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा लवकरच पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात शरद पवार यांना नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण आलं तर जाणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले की, “उद्यापासून (२५ नोव्हेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे”, असं म्हणत शरद पवारांनी थेट बोलणं टाळलं.

ईव्हीएमबाबत शंका आहे का?

“लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची राज्यातील जनतेची भावना होती. त्यामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात विश्वास होता. त्या विश्वासामुळे आम्ही ज्या प्रकारे प्रचार केला. मात्र, त्याही पेक्षा जास्त प्रचार करण्याची गरज होती असं आता वाटतं. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवारांनी म्हटलं.

‘बटेंगे तो कटेंगे’घोषणेचा महाविकास आघाडीला फटका बसला का?

विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. मात्र, याचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी बटेंगे तो कटेंगेमुळे आम्हाला फटका बसल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला. मात्र, त्या नाऱ्यामुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्याचा निश्चितच फरक पडला”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Story img Loader