Sharad Pawar on Manoj Jarenge Taking Nomination Back from Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. ते राज्यातील विविध मतदारसंघातून उमेदवार उभे करणार आहेत. ठरलेल्या मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारांनी अर्जही भरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटची तारीख असल्याने त्यांनी सर्वच उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगेंनी हा चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आज महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. महाविकास आघाडीचा दबाव होता म्हणून मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली. या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Manoj Jarange on Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >> Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”

…तर भाजपालाच फायदा झाला असता

शरद पवार म्हणाले, “या महाविकास आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निर्णयही (निवडणूक लढवण्याचा) त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. ते भाजपाविरोधात खेळले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे.”

मनोज जरांगेंची माघार का?

“एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते”, असंही जरांगे यांनी सांगितलं.

माझ्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही-जरांगे

“महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे एकटा नाही. तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे”, असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Story img Loader