राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये जळजळीत टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत पवार यांना मनसेने केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आजच शिवसेनेवर टीका करताना, “राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेनं शिवतिर्थावरील टोमणे मेळाव्यासाठी हिंदूत्वाची वचनपूर्वी असं पोस्टर लॉन्च केलं आहे. नवाब सेनेच्या नवाब प्रमुखांनी आदरणीय बाळासाहेबांची भाषणं, मुलाखती आणि पत्रकार परिषदा परत एकदा ऐकण्याची गरज आहे. त्या जर आपल्याकडे नसतील तर आम्ही त्या तुमच्याकडे पाठवू. सत्तेत आल्यावर हिंदुत्व गुंडाळून काँग्रेस, राष्ट्रवादीची लाचारी करायची व सत्ता गेल्यावर हिंदुत्वाची आरोळी ठोकायची. यांची ही भूमिका म्हणजे दुतोंडी आहे,” अशी टीका केली होती.

नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

यापूर्वी मनसेकडूनही अशापद्धतीची टीका केली आहे. “मनसेकडून असा आरोप केला जातो की शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे. अशापद्धतीची आरोप केला आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता?” असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवलं. “प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात (आमदार) निवडून आणता येत नाही. त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं,” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on mns criticizing ncp scsg