केंद्रातील मोदी सरकारनं संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगावत शरद पवार यांची सभा पार पडत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “आमच्याकडं तशी माहिती नाही.”

हेही वाचा : “…तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही”, विजय वडेट्टीवार यांची ठाम भूमिका

“मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी बैठक बोलावली आहे. त्याबैठकीत याप्रकरणाचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही. सत्ताधारी लोकांना देशाशी निगडीत असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, हे मला समजत नाही,” असा टोला शरद पवारांनी मोदी सरकारला लगावला.

हेही वाचा : जालना मराठा आंदोलकांवरील लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांची माफी, रोहित पवार लक्ष्य करत म्हणाले…

यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला हे लोक घाबरले आहेत. भाजपाचे लोक भित्रे आहेत. त्यामुळे विषयांना बगल देण्याचं काम ते करतात. ‘इंडिया’ आघाडी मजबूत आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on modi govt remove india name constitution ssa
Show comments