विज्ञान परिषदेत शरद पवार यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी उत्पादनावर भर द्या, त्याकरिता नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा, संशोधनाची आवड निर्माण करा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात चौथ्या विज्ञान परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना दिली तर ते देशाचा नावलौकिक उच्च पातळीवर नेण्यासाठी यशस्वी वाटचाल करतील असेही त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेची शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल झाली असून या संस्थेचे जाळे राज्यभरात पसरले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ६० विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण देत आहे.

रयत शिक्षण संस्था व डॉ. होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स या संस्थेशी संलग्न होत ही तीन दिवसीय परिषद सुरू झाली असून या आधी सातारा, हडपसर, नगर या ठिकणी ही परिषद भरविण्यात आलेली होती.