‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पण, यावर आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटातील आमदारांवर व्हीप बजावण्यात येऊ नये, अशा सूचना न्यायालयाने केल्या. याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

“तेव्हा काँग्रेस-आय आणि काँग्रेस-एस असं दोन पक्ष निर्माण झाले असते. काँग्रेस ‘एस’चा अध्यक्ष मी होतो. काँग्रेस ‘आय’च्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. तेव्हा काँग्रेस हे नाव वापरण्याचा अधिकार होता. नाव काढून घेतलं नाही. काँग्रेसने हात घेतला, तर आम्ही घड्याळ घेतलं,” असं शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हेही वाचा : “फुटीर गट, अपात्र आमदार अन्…”, कपिल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केले ‘हे’ सहा मुद्दे

“निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्यांना देण्याचा निर्णय आजपर्यंत कधी या देशात झाला नाही. सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला आणि नेतृत्वाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा लोक त्यांच्या मागे उभे राहतात. नेते शिवसेना सोडून गेले आहेत. कट्टर शिवसैनिक १०० टक्के उद्धव ठाकरेंबरोबर आहे. त्याची प्रचिती उद्या निवडणूका येतील तेव्हा कळेल,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

हेही वाचा : “…म्हणून भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर”, कपिल सिब्बलांचा कोर्टासमोर युक्तिवाद; शिंदे गटावर तीव्र आक्षेप!

“निर्णय कोण घेतं याची शंका आमच्या मनात आहे. निवडणूक आयोग निर्णय घेतो की, त्यांना कोणाचं मार्गदर्शन आहे. यापूर्वी अनेकदा पक्षात फुटी झाल्या. समाजवादी पक्षात फूट होऊन प्रजा समाजवादी पक्ष झाला. काँग्रेस मध्ये फूट पडून समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाले. मात्र, पक्षच काढून घेत दुसऱ्यांना देणं हे कधी घडलं नव्हतं. जे घडलं याच्या पाठीमागे मोठी शक्ती असल्याचं नाकारता येत नाही,” अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केली.

Story img Loader