अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह ‘घड्याळ’ पक्षचिन्हावर आपला दावा ठोकला आहे. तसेच ३० जून रोजीच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आहे, अशा आशयाचं पत्र अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलं आहे. यामुळे दोन्ही गटातील वादाला ठिणगी पडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर आता स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. अजित पवारांची अध्यक्ष पदावर झालेल्या कथित नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कुणी काय केलं ते मला माहीत नाही. पण एक गोष्ट पक्की आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष मीच आहे. दुसरं कुणी स्वत:च्या नावाने विधान केलं असेल किंवा काही बोललं असेल तर ते तसं बोलू शकतात. याला काहीही महत्त्व नाही. यामध्ये काहीही तथ्य नाही.”

हेही वाचा- मोठी अपडेट: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

खरं तर, आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय स्तरावरील काही नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमताने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. या बैठकीत अजित पवारांसह ९ आमदारांना आणि दोन खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar press conference in delhi ncp president ajit pawar rebellion rmm
Show comments