वाई : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.

कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. आज त्या निवडी होणार होत्या. मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांची निवड करण्यात आली. सचिव पदावर कोणालाही संधी देण्यात आली नाही. विठ्ठल शिवनकर यांनाच सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे.

ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
dr shraddha tapre
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

हेही वाचा – …आणि सुषमा अंधारे शरद पवारांसमोरच ढसढसा रडल्या, म्हणाल्या, “माझं चुकत असेल तर…”

कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे रोजी पुण्यात होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची वाढती संख्या आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी भाषणातून केले होते. त्यानुसार आगामी काळात सचिव पदासाठी माजी सनदी अधिकारी आणि साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला स्वतः विकास देशमुख हजर होते.

हेही वाचा – “कर्नाटकात भाजपाला ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, कारण…”, नाना पटोलेंचं विधान

आज नेमण्यात आलेले उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे उपाध्यक्ष – जयश्री चौगुले वाशी, अरुण कडू पाटील उरण, एडवोकेट राम कांडगे पुणे, महेंद्र लाड पलूस, आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, विनोद कुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य ॲड. भगीरथ शिंदे, माजी मंत्री अजित दादा पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, एडवोकेट रवींद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकू कोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्राध्यापक सदाशिव कदम आणि धनाजी बलभीम पाटील, आजीव सेवक प्रतिनिधी नवनाथ जगदाळे, डॉक्टर संजय नगरकर, ज्योस्ना सुधीर ठाकूर.