उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांबरोबर २०१९ साली ७२ तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापन झालं होतं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असं वक्तव्य ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

हेही वाचा : “…तेव्हा तुम्ही का पळून गेला”, भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका!

“असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची…”

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांना विचारलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

हेही वाचा : अजित पवारांचा बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना खोचक टोला; म्हणाले, “बेडकाला वाटतं…”

“प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी…”

७२ तासांचं सरकार स्थापन झाल्यावर महाविकास आघाडीत शरद पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, याबद्दल विचारलं असता, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं काय तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar react devendra fadnavis statement ajit pawar oath sharad pawar support ssa
Show comments