उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जातो आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात येत आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’वरून शरद पवारांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घोषणेवरून भाजपावर टीकास्र सोडलं आहे. नुकताच माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे. अर्थात तेच जातीयवादी आहेतच, पण या घोषणेने ते अधोरेखित केलं आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना, खरं तर निवडणुका येतात आणि जातात. पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करता कामा नये. पण त्याचं भान भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांना नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंकडूनही भाजपावर टीकास्र

उद्धव ठाकरेंनीही या घोषणेवरून भाजपाला लक्ष्य केलं. एका प्रचारसभेत बोलताना भाजपाचे लोक आता ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहेत. मात्र, आम्ही कुणाला कापूही देणार नाही आणि कुणाला महाराष्ट्र लुटूही देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला काँग्रेसचे प्रत्युत्तर

दरम्यान, भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला काँग्रेसने ‘जुडेंगे तो जितेंगे’ या घोषणेने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाकडून वातावरणनिर्मितीसाठी या घोषणेचा वापर केला जातो आहे. त्यामुळे भाजपाच्या या घोषणेला काँग्रेसकडून ‘जुडेंगे तो जितेंगे’या घोषणेने प्रत्युत्तर दिले जाईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा – Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

‘बटेंगे तो कटेंगे’वर अजित पवारांची भूमिका काय?

भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘भाजपाबरोबर महायुतीमध्ये समान कार्यक्रमांतर्गत आहोत. राज्याचा विकास व्हावा, यासाठी महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत,’ असं अजित पवार म्हणाले.