शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे सातत्याने सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर टीका करताना दिसतात. तर भाजपाकडून आमदार नितेश राणे यांची संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका सुरू असते. याचदरम्यान, आमदार नितेश राणे यांनी आज (७ मे) एक मोठा दावा केला आहे. संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत आणि बोलणीही सुरु आहेत, असा दावा राणे यांनी केला.

नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतची माहिती मला सूत्रांनी दिली आहे. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका नीट पाहा. तसेच त्याआधीची भूमिका देखील पाहा. संजय राऊत हे सातत्याने अजित पवारांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी संजय राऊत यांची एक अट आहे. ती म्हणजे अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी राष्ट्रवादीत प्रवेश करतो.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हे ही वाचा >> सुप्रिया सुळेंना पक्षात मोठी जबाबदारी देणार? शरद पवार म्हणाले, “एका वर्षात…”

राणे यांच्या दाव्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पंढरपूरमध्ये आहेत. आज त्यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी नितेश राणेंच्या दाव्याबद्दल विचारलं असता. शरद पवार म्हणाले, कोणीतरी सिरियस (महत्त्वाचं) बोलण्यात ज्यांचा लौकीक आहे अशा लोकांना उत्तर द्यावं. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार.