Sharad Pawar Rashmi Shukla Transferred : राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर पोलीस महासंचाक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले असून पोलीस महासंचालक पदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणावर आता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांचा कालखंड संपलेला आहे. त्याबद्दल अनेक लोक जाहीरपणे बोलतात. त्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कालखंडात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले. पदरचनेतील शुक्ला यांच्या नंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. त्यानुसार, विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयुक्तांनी दिले होते संकेत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रश्मी शुक्लांबाबतच्या प्रश्नावर अशा कारवाईसंदर्भात संकेत दिले होते. त्यावेळी रश्मी शुक्लांबाबत बोलताना “यासंदर्भात योग्य तो तपास करून निर्णय घेतला जाईल”, असं राजीव कुमार म्हणाले होते. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशांचं विरोधी पक्षांकडून स्वागत केलं जात आहे.
रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसची आयोगाला आणखी एक विनंती
मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. झारखंड व पश्चिम बंगालच्या डीजीपींची बदली निवडणूक जाहीर झाल्यानंतरच केली होती. पण रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी इतके दिवस का लागले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. पण आता रश्मी शुक्ला निवडणुकीशी संबंधित कोणत्याही व्यवस्थेत राहू नयेत, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी विनंती आमची निवडणूक आयोगाला असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
म