कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय समीकरणं आखली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारत घेत महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जात आहे. यानंतर आता तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठं विधान केलं. आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. तो आमचा आकडा कायम राहील, असं विधान संजय राऊतांनी केलं.

Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

हेही वाचा- “सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या”; कथित मारहाणप्रकरणी संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्या बाईने…”

राऊतांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला अजून अवकाश आहे. संजय राऊतांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला असा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसू आणि यावर सामंजस्याने मार्ग काढू” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “…तर फडणवीसांना त्यांची किंमत कळेल”, गुवाहाटीहून परतलेल्या आमदाराची बोचरी टीका!

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या जागा आमच्याच राहणार. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी ती एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असं म्हणतोय मी. ही आमची मागणी नाही.”