शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडं परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “विठ्ठलाला बडवे भेटू देत नाहीत. कसले बडवे आणि कसलं काय? विठ्ठलाच्या दर्शनाला देशात आणि राज्यात कोणीही थांबवू शकत नाही. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरलाच जावं लागलं, असं नाही.”

“महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारीला लोक जातात. उन्हातान्हातून, दगड-धोंड्यातून जातात. अंतकर्णात एकच भावना असते, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. पंढरपूरला पोहचल्यानंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही. बाहेरून कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने पुढे जातात. त्यामुळे विठ्ठल, गुरू म्हणायचे आणि आमच्याकडं दुर्लक्ष झालं, असं सांगायचं. मोठी गंमतीची गोष्ट आहे,” असा टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला आहे.

हेही वाचा : “सर्वात जास्त अपमान अन्…”, अजित पवारांचा उल्लेख करत धनंजय मुंडेचं भावनिक भाषण

“मला आठवतं, असेच एक नेते तुंरुगात गेले. काही महिन्यानंतर त्यांची सुटका झाली. निवडणुका आल्यावर लोकांनी सांगितलं, खटल्याचा निकाल लागेपर्यंत संधी देऊ नका. पण, त्यांच्यावर अन्याय होत, तुरुंगात बसावं लागले. अशावेळी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना एकटं पडू देणार नाही. माझा पक्ष त्यांच्या पाठीमागे असेल. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं. तेव्हा शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधीवेळी पहिलं नाव त्यांचं दिलं,” असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे”, भुजबळांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“तीन दिवसांपूर्वी सकाळी मला फोन आला. मला विचारलं कायं चाललं. मी म्हटलं, मलाही माहिती नाही, कायं चाललं आहे. ते म्हणाले, ठिकंय मी जातो, बोलतो आणि कळवतो. नंतर तीन वाजता पाहिलं, तर शपथ घेतली. त्यामुळे इथून पुढे बघून घेतो, सांगितलं, तर जरा जपून,” अशी टोलेबाजी शरद पवारांनी छगन भुजबळांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reply chhagan bhujbal over badave all over vitthal ssa
Show comments