गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याच नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे शरद पवारांनी अचानकपणे दिलेला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा! लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. त्यापुढचे तीन तास उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी शरद पवारांची मनधरणी करत होती. मात्र, शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिले. आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
समितीची बैठक का महत्त्वाची?
वास्तविक शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अर्थात सुप्रिमो असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यास समितीच्या बैठकीची आवश्यकता उरणार नाही अशी प्रतिक्रिया खुद्द समितीमधल्या सदस्यांनीच व्यक्त केली आहे. मात्र, शरद पवारांनीच राजीनाम्याची घोषणा करताना या समितीची घोषणा करून ही समितीच अध्यक्षपदाविषयी निर्णय घेईल, असं जाहीर केल्यामुळे आजच्या समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
शरद पवारांचे संकेत!
दरम्यान, एकीकडे समितीची आज बैठक होणार असून त्यात शरद पवार यांचा राजीनामा किंवा नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब यापैकी एका गोष्टीवर निर्णय होण्याची शक्यता असताना दुसरीकडे शरद पवारांनी तेच अध्यक्षपदी कायम राहण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. गुरुवारी वाय. बी. सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवारांनी “दोन दिवसांनी तुम्हाला असं आंदोलन करायला बसावं लागणार नाही”, असं विधान केल्यामुळे तेच अध्यक्ष राहण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आजच्या बैठकीत कशावर चर्चा?
गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अध्यक्ष निवड समितीची बैठक होत आहे. त्यात कार्यकर्त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, सुप्रिया सुळेंच्या नावाची अध्यक्ष म्हणून असणारी चर्चा, शरद पवारांनी घेतलेली भूमिका या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आधीच आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय, अजित पवारांनीही पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळीच बोलताना नव्या अध्यक्षाच्या पाठिशी आपण उभे राहू, असं विधान केल्यामुळे तेही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील यांनी स्वत:च शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावं, असं मत मांडलं आहे. सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवारांची मनधरणी करण्याचीच भूमिका घेतल्यामुळे पुन्हा शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहतील, असं सांगितलं जात आहे.