Sharad Pawar महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल. दरम्यान जागा वाटप होत असताना अनेक ठिकाणी एकाच पक्षातल्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंमधले नेते हे बंडखोरी करत आहेत किंवा जो तिकिट देईल त्या पक्षाची वाट धरत आहेत. महाविकास आघाडीत हे प्रमाण अधिक दिसून येतं आहे. आता या सगळ्या बाबत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. तसंच त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. एकमेकांची सुख, दुःखं सांगतात. मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता दीपावलीच्या प्रसंगी समाधान आणि आनंदाने एकत्र येतील. मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जनतेचा आत्मविश्वास वाढो अशा सदिच्छा व्यक्त करतो असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हे पण वाचा- Raj Thackeray : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटले, कारण..”, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?

आम्ही लवकरच मार्ग काढू, ६ नोव्हेंबरपासून प्रचार

१०-१२ ठिकाणी जे काही थोडेफार मतभेद आहेत ते दूर होतील. जिथे दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तिथे मार्ग काढला जाईल. ६ नोव्हेंबरपासून मी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर सगळेच प्रचार सुरु करतो आहोत. महाराष्ट्रातली जनता आम्हाला उत्तम साथ देईल. यानंतर सिंचन घोटाळ्याबाबत शरद पवारांना ( Sharad Pawar ) प्रश्न विचारला असता कशाला आज विचारता ? चांगला दिवस आहे म्हणत त्यांनी बोलणं टाळलं आहे.

महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती २०१९ पेक्षा वेगळी

महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती २०१९ पेक्षा या निवडणुकीत पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रात २०२४ ला युती विरुद्ध आघाडी अशी लढत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आहेत त्यांचे चार पक्ष तयार झाले आहेत. सध्याची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. या लढतीत सत्तेतले तीन पक्ष आणि विरोधातले तीन पक्ष असे सहा पक्ष समोरासमोर आहेत. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष काय कामगिरी करतो ? वंचित बहुजन आघाडी आणि तिसऱ्या आघाडीची कामगिरी कशी असेल? जरांगे फॅक्टरचा परिणाम कसा होईल ? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्या पक्षांचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र अनेक ठिकाणी समोरासमोर उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र हा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader