आज औरंगाबाद शहरातील एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन सभागृहामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्याच्या कार्यक्रमाला आज शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या दोघांच्या हस्ते एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये भाषण देताना शरद पवार यांनी ते शिक्षणमंत्री असतानाच एक किस्सा आवर्जून सांगितला. विशेष म्हणजे शरद पवार यांनी हा किस्सा सांगताना अगदी हात जोडल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> अर्थमंत्री अजित पवारांना आज चांगली झोप लागणार नाही; जाहीर भाषणात शरद पवारांचं वक्तव्य; अन् त्यानंतर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा