अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षात दोन गट पडले आहेत. पक्ष फूटल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (८ जुलै) पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. पवार यांनी नाशिकच्या येवला येथे सभेला संबोधित केलं. या सभेत बोलताना शरद पवार यांनी त्यांच्यावर स्वतःच्या पक्षातील लोकांनी केलेल्या टीकेला उत्तरं दिली. अजित पवारांनी केलेल्या निवृत्ती आणि वयाबद्दलच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही उत्तर दिलं.

भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार म्हणाले, आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहिजे.

Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

शरद पवार म्हणाले, मी माफी मागितली पाहिजे, कारण आज ना उद्या मला लोकांना सामोरं जायचं आहे. कधी ना कधी लोकांच्या समोर जायची वेळ येईल. ती वेळ आज येईल, उद्या येईल, परवा येईल, एका महिन्याने अथवा वर्षाने येईल, पण ती वेळ येणारच आहे, म्हणून माफी मागतो. मी पुन्हा अशी चूक करणार नाही, योग्य निकाल सांगेन. त्यामुळे मला मतदार संघातील लोकांची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही.

हे ही वाचा >> “तुमची असेल-नसेल ती सगळी ताकद लावा अन्…”, पंतप्रधान मोदींना शरद पवारांचं जाहीर आव्हान

आपण पक्ष फूटण्याचा अंदाज लावू शकलो नाही, अशी खंत शरद पवार यांनी आज (८ जुलै) दुपारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार त्याबद्दलच माफी मागत असावेत असं बोललं जात आहे. तर काहींच्या मतानुसार शरद पवारांचा रोख छगन भुजबळांकडे होता. भुजबळांना येवल्यातून उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं, त्याच भुजबळांनी पक्षाशी बंडखोरी केल्यामुळे मतदारांना त्रास झाला आहे असं म्हणत पवार यांनी माफी मागितली, असं म्हटलं जात आहे.

Story img Loader