हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माथाडी कामगार आणि हमालांचे नेते दिवंगत शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. याप्रसंगी शरद पवार म्हणाले, ज्यांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा माथाडी आणि हमाल या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांसाठी दिला ते लोकनेते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी करण्यात आले. शंकरराव व त्यांचे सहकारी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. कष्टकऱ्यांमधून आलेले नेतृत्व, २५ वर्षे नगरसेवक, सात वर्षे या अहमदनगरचे नगराध्यक्ष आणि अनेक वर्षे माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकररावांची ओळख सगळ्यांना आहे. त्याचे कायमस्वरुपी स्मरण राहावे म्हणून या ठिकाणी शंकररावांचा पुतळा उभा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा