Sharad Pawar as Uddhav Thackeray Bag Checked at Wani Helipad : वणी (यवतमाळ) येथे सोमवारी (१० नोव्हेंबर) शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी वणीला जात असताना जवळच्या हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरलं. हेलिपॅडवरच उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. तसेच त्यांच्या ताफ्यातील इतर बॅग व वस्तू तपासण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी वणीतील सभेत या प्रकारावर टीका करून सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत यंत्रणेने दाखवावी, असं आव्हान दिलं. या घटनेनंतर वणीतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंपाठोपाठ महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

“आम्हाला जे कायदे लागू आहेत, ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील लागू असले पाहिजेत. नरेंद्र मोदी, अमित शाहा यांची येताना नव्हे, तर जातांना तपासणी करा. महाराष्ट्र लुटून ते नेत आहेत”, असा हल्लाबोल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशीम येथे केला. तर वणी येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “दाढीवाल्या मिंध्याची कधी तपासणी केल्याचं आम्ही पाहीलं नाही. दाढीवाल्या मिंध्याची, गुलाबी जॅकेटवाल्याची बॅग कधी तपासली नाही. तो तिसरा… तिसरा कोण?” यावर लोकांनी टरबूज, टरबूज अशी घोषणा दिली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “टरबुजाची कधी तपासणी केलीय का?”

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं”, फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा; औरंगजेबाचा उल्लेख करत म्हणाले…

शरद पवारांची हतबल प्रतिक्रिया

दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “त्यांच्या हातात सत्ता आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवलं आहे. विरोधकांना त्रास देणं हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा (धोरण) असल्याचं जाणवत आहे. आम्हाला ते सहन करावं लागेल. परंतु, त्यावर नाराजी व्यक्त करणे देखील आवश्यक आहे. म्हणून मी माझी नाराजी प्रकट करत आहे. जे काही चाललंय ते सामान्य जनतेला दिसतंय. विरोधकांना ज्या प्रकारची वर्तणूक दिली जात आहे ते पाहून जनता देखील संतप्त आहे. मला वाटत नाही जनतेला हे काही आवडलं असेल.”

हे ही वाचा >> मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका

शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकल्यावर त्यांना विचारण्यात आलं की याचा महाविकास आघाडीला निवडणुकीत काही फायदा होईल का? त्यावर शरद पवार म्हणाले, “त्या गोष्टींचा फायदा वगैरे नसतो किंवा ही गोष्ट व्हावी असं विरोधकांना वाटत नसतं. त्यामुळे याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल की नाही हा मुद्दा इथे उपस्थित होत नाही. केवळ सत्ताधाऱ्यांची वृत्ती समोर येते.

Story img Loader