कराड : देशाची व राज्याचीही सत्ता ज्यांच्या हाती आहे. त्यांना संकटग्रस्त जनता, दुष्काळ, पाणी प्रश्नाची जाण नाही. या लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असताना, ते याकडे डूंकनही पाहत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. दहिवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, अभयसिंह जगताप, डॉ. सुरेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>> शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संभ्रम? संजय राऊत म्हणाले, “आम्ही ठरवलंय…”

devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Rohit Pawar On Salil Deshmukh Nagpur Ajit Pawar
Rohit Pawar : शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट; पडद्यामागे काय घडतंय? रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार…”
Image Of Jagdeep Dhankhar.
Jagdeep Dhankhar : “जग आपल्याकडे पाहत आहे, तरीही आपण…” संसदेतील गदारोळावर राज्यसभेच्या सभापतींची उद्विग्न प्रतिक्रिया
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटग्रस्तांच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले का? असा प्रश्न करून खासदार शरद पवार म्हणाले की, माणदेशाचा पाणी हा खरा प्रश्न आहे. माणदेशावर दुष्काळाचे संकट ओढावले असल्याने त्याचा आढावा घ्यावा, दुबार पेरणीचं संकट ओढावले असल्याने आपल्याशी बोलावे. याचबरोबर सहकाऱ्यांच्या भूमिकेतून आम्ही आलो असल्याचे सांगत सातारा जिल्ह्याचे आणि माण-खटाव या टंचाईग्रस्त तालुक्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या विचारांचीच माणसं सोबत असावीत अशी भूमिका घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले. 

हेही वाचा >>> “…तर अजित पवार परत येऊ शकतात”, भास्कर जाधवांचं मोठं विधान

लोकसभेत तुम्ही मला येथून पाठवले तेव्हाही दुष्काळस्थिती होती. परंतु, आपण या इथल्या जनतेला दिलासा देण्यात कमी पडलो नाही, त्यावेळी चारा छावण्या दिल्या पाण्याचे टँकरही कमी पडू दिले नाही. दुष्काळातील जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी माणदेश सदैव राहिल्याचे ऋण आपण कदापि विसरू शकणार नाही. इथले प्रश्न सोडवणे, जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच असल्याचा विश्वास शरद पवार यांनी दिला.

कांद्यावरुन केंद्र सरकार लक्ष्य

सध्या केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात कर बसवल्याने  वातावरण पेटले आहे. आपण केंद्रीय कृषिमंत्री असताना कधीच कांद्यावर निर्यात कर बसवला नाही. कांदा उत्पादकांना  त्यांचा माल जगात कुठेही विकण्यासाठी थांबवले नाही.

संसदेत त्यावेळी या प्रश्नावर भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून माझ्यासमोर आले होते. त्यावर कांद्याच्या माळा अथवा कवड्याच्या माळा घाला, मी कांद्यावर  निर्यात कर बसवणार नसल्याचे सांगितले होते.

कधी नाही तो कांद्याला भाव मिळताना शेतक-याला दोन पैसे मिळत आहेत. असे असताना एकीकडे महागाई  दुसरीकडे शेतकऱ्‍यांविरुध्द धोरणं राबवली जात आहेत. त्याविरोधात आम्ही लढू. कांदा, ऊस वा टोमॅटो कुठल्याही शेतीमालावर बंधन नको असल्याचे शरद पवार म्हणाले.

Story img Loader