‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगावऐवजी गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सध्या सत्तेत असणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यासाठी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आधीच्या सरकारला म्हणजेच महाविकास आघाडी सरकारला यासाठी जबाबदार ठरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागील दोन वर्षांमध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी बाहेर गेली असेल असं मत व्यक्त केलं. तर उदय सामंत यांनीही अशाच पद्धतीचं विधान करत आधीच्या सरकारवर टीका केली. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचा थेट उल्लेख करत त्यांना या टीकेवरुन खडे बोल सुनावले आहेत.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा