राज्यात एकीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा राजकीय सामना चालू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्येही एकमेकांवर आरोप केले जात असल्याचं दिसून येत आहे. सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं थेट शरद पवारांना लक्ष्य करत ते वारसदार तयार करण्यात अपयशी ठरल्याची भूमिका मांडली असताना तिकडे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वेगळाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा प्लॅन बी सुरू आहे, असं विधान चव्हाणांनी केल्यानंतर त्यावरून आता शरद पवारांनी खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमका वाद काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देताना “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा ‘प्लॅन बी’ सुरू आहे,” असा मोठा दावा केला होता. त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. खुद्द शरद पवारांनीही नंतर माध्यमांशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांनी चव्हाणांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर टीका केली होती. “काही लोकांची पक्की मतं असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्याचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं पक्कं मत असं असतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की, त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

शरद पवार म्हणतात, “आम्ही काय केलंय, हे त्यांना माहिती नाही”, वारसदार तयार करण्याच्या टीकेवर ठाकरे गटाला सूचक प्रत्युत्तर!

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

दरम्यान, आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांना चव्हाणांच्या विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा चव्हाणांनी त्यांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं, असा टोला पवारांनी लगावला. “त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.