लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी ६ वाजता थांबला असून २६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्याआधी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सत्ताधारी भाजपा व मोदी-शाहांवर खोचक टीका केली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणीसांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी माढ्याच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १० वर्षं जुना ऑडिओ ऐकवला होता. त्यात मोदी महागाई, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर बोलताना ऐकू येत आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

“मोदींनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा दबाव असतानाही संधी मिळाली तेव्हा गॅसचे भाव कमी केले. ते स्थिर ठेवण्याचं काम केलं. त्यामुळे पवारांनी आम्हाला हे सांगू नये. त्यांचे व्हिडीओ आम्ही दाखवायला सुरुवात केली तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे लक्षात येईल”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

दरम्यान, शरद पवारांना आज माध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “ते काय म्हणाले याला काही अर्थ नाही. या लोकांना लक्षात आलंय की आपला पराभव होणार आहे. त्यांची सगळ्यांची भाषणं बघा. मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांची बघा भाषणं बघा. ते फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका करतात. तुम्ही १० वर्षं सत्तेत आहात. त्यामुळे उगीच दुसरे विषय काढू नका. १० वर्षांचं रेकॉर्ड लोकांसमोर मांडा. यांच्याकडे दुसरं काही मांडायला नाही. म्हणून लोकांसमोर ते ही विधानं करत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

महायुतीच्या सभांवर टीका

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या राज्यात मोठ्या संख्येनं सभा होत असल्याचा मुद्दा उपस्थित होताच शरद पवारांनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “राज्यात हाती काही येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते सभा घेत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar slams devendra fadnavis on loksabha election 2024 pmw