राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर निशाणा साधला. यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांचा समावेश होता. राज ठाकरेंच्या टीकेला आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
जातीपातीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
बिगर भाजपा पक्षांची मोट काँग्रेसला सोबत घेऊनच बांधावी लागेल. काँग्रेसला सोडून अशी आघाडी केली तर ते योग्य होणार नाही अशी माझी भूमिका आहे.
मी अनेक राज्यांत बघतो की मुख्यमंत्री अनेकदा घरी बसून निर्णय घेतात. घरी दुसरं कार्यालय असतं. आपल्याकडे वर्षावर तसं आहे. ते आले-नाही आले यामुळे राज्याचा कारभार थांबलेला नाही. त्यांच्याकडे ज्या फाईल्स जातात त्यावर वेळेवर निर्णय होतात. त्यांच्या आरोग्याचे काही प्रश्न होते. ते कमी होऊ आता मुख्यमंत्री मंत्रालयात आले याचा मला आनंद आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही. ते कामगार आहेत. त्यांच्या काही मागण्या असतील. त्या मागण्यांसाठी ते महिनोन महिने आंदोलनाला बसले. त्यांना चुकीचं नेतृत्व मिळालं. प्रश्न राज्य सरकारकडे, एसटी महामंडळाच्या निर्णयक्षम अधिकाऱ्यांचा होता. पण त्यांचा उल्लेख न करता माझं नाव घेऊन टीका-टिप्पणी करून कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मनात काहीतरी भरवलं गेलं. त्याचा हा परिणाम आहे. त्यांना दोष न देता त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या घटकांवर कारवाई व्हायला हवी.
राज ठाकरेंनी काहीतरी बालिश पद्धतीने भाषणात उल्लेख केला. त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? अजित पवार-सुप्रिया सुळेंबद्दलचा आरोप राजकीय नसून पोरकट आरोप आहे. मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का?
राज ठाकरेंच्या पूर्ण भाषणात भाजपाबद्दल काही वाक्य होती, पण त्यांच्यावर भाजपानं कदाचित काही जबाबदारी दिली असावी. ती निभावण्याची संधी त्यांनी साधली असावी. भाजपाबद्दल राज ठाकरे एक शब्द देखील बोलत नाहीत. याचा अर्थ काय?
राज्य सरकार यासंदर्भात गांभीर्याने विचार करेल.
खरा प्रश्न महागाई, बेरोजगारी आहे. आत्ता महाराष्ट्रात सामाजित ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न दिसतोय. सांप्रदायिक विचारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळे अशा विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. राज्याची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत. लोकांनी याला बळी पडू नये.
राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष असा आहे, ज्याचं नेतृत्व सुरुवातीला छगन भुजबळांच्या हातात होतं. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष छगन भुजबळ होते. मग मधुकर पिचड, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे अध्यक्षपद होतं. ज्या पक्षात नेतृत्वाच्या जबाबदार जागांवर असे लोक आहेत, अशा पक्षाला जातीयवादी ठरवणाऱ्या प्रश्नावर उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही.
दुसरी गोष्ट आहे की माझ्यापुढे काही आदर्श आहेत. त्या आदर्शांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. त्यांचं लिखाण वाचलं, तर याबाबत सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, पण सगळेच वाचत असतील, कुटुंबातले लोक वाचत असतील असं नसावं. त्यामुळे अशी विधानं केली गेली असावीत. यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही.
त्यांच्या सभा मोठ्या होतात. पण त्या सभेत शिवराळ भाषा, नकला असतात. त्यातून करमणूक होते. त्यामुळे लोक जातात. त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. एकच मंदीर आहे. तिथे फोडतो. त्याचा आम्ही कुठे गाजावाजा करत नाही.
त्यांनी स्वताच्या पक्षाबाबत काय बोलायचं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते म्हणतात हा पक्ष संपवणारा पक्ष आहे. याची नोंद महाराष्ट्राच्या मतदारांनी घेतली आणि त्यांच्या पक्षाला विधिमंडळात एकही जागा दिलेली नाही. त्यातून मतदारांनी त्यांची योग्य किंमत केली आहे.
हे जे काही सगळं त्या काळात घडलं, याचं सविस्तर वाचन केलं असतं, तर असे उद्गार काढले गेले नसते.
सोनिया गांधींनी देशाचं पंतप्रधान व्हावं की नाही, या मुद्द्यावर माझं मत जाहीर होतं. पण मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की सोनिया गांधींनी स्वत:हून पंतप्रधानपदाची उमेदवार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हा प्रश्न संपला. सोनिया गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आमचा वादाचा विषयच राहिला नाही. त्यानंतर एकत्र येऊन काहीतरी करावं, अशी सूचना अन्य सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही एकत्र आलो, आजही आहोत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकच आहेत. त्यामुळे ही भूमिका मी काही ऐन वेळी बदललेली नाही.
आज प्रश्न महागाई, दरवाढीचे प्रश्न होते. यातल्या एकाही प्रश्नावर कुणी बोलत नाही. कालच्या एवढ्या मोठ्या भाषणात सामान्य माणसाच्या सुख-दु:खासंबंधी एकाही प्रश्नाचा उल्लेख नाही. भाजपाच्या राज्यपद्धतीचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे त्या भाषणावर अधिक काही बोलण्याचं कारण नाही.
जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून माहिती पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असं म्हटलं होतं. एखाद्या लेखकानं गलिच्छ प्रकारचं लिखाण केलं आणि त्याला माहिती देण्याचं काम पुरंदरेंनी केलं असेल, आणि त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाही.
पुरंदरेंबद्दल मी बोललो. मी काही लपवून ठेवत नाही. पण पुरंदरेंनी जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेवांनी ते घडवलं असा उल्लेख केला. त्याला माझा सक्त विरोध आहे. शिवछत्रपतींचं व्यक्तीमत्व राजमाता जिजामातांनी कष्टानं उभं केलं. बाबासाहेबांनी त्यावर लिहिण्याचा केलेला प्रयत्न योग्य नव्हता. त्यावर मी टीका केली.
फुले-शाहू-आंबेडकरांचा उल्लेख केला जातो, असा आरोप केला. पण त्याचा अभिमान आहे मला. फुले, आंबेडकर, शाहू महाराज हे शिवचरित्राबद्दल अतीव आस्था असलेले घटक आहेत. महाराजांबद्दलच्या आस्थेचा विचार करून हातातल्या सत्तेचा वापर कसा करावा, याबाबत भूमिका या तिघांनी मांडली.
ते काल म्हणाले, की शिवाजी महाराजांचं नाव मी कधी घेत नाही. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. तुम्ही माझं अमरावतीचं भाषण मागवलं, तर शिवाजी महाराजांच्या योगदानावर माझं किमान २५ मिनिटांचं भाषण होतं. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याची माझी सवय आहे. पण त्यासाठी मला सकाळी उठावं लागतं. सकाळी त्यांनी काय लिहिलंय, हे न वाचता त्यांनी वक्तव्य केलं असेल, तर मी त्यांना दोष देणार नाही.
वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून आपलं मत व्यक्त करत असतात. पण ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. पण तुम्ही प्रश्न विचारला, म्हणून मला त्यात काहीतरी सांगावं लागेल.
“शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती? “