महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत काय होणार त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. दरम्यान राज ठाकरेंनीही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. प्रचारसभांच्या दरम्यान राज ठाकरे हे सातत्याने शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, फोडाफोडी केली हे म्हणत आहेत. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी ( Sharad Pawar ) राज ठाकरे मूर्खासारखं बोलतात म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे” तसंच “शरद पवार यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील. मी केलेल्या अनेक गोष्टींचे पुस्तक त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना कळेल की, ते कोणत्या गोष्टी विसरले आहेत.” असंही राज ठाकरे म्हणाले. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी ( Sharad Pawar ) राज ठाकरे मूर्खासारखं काहीही बोलत आहेत असं म्हणत टीका केली आहे.

Amit thackeray and mitali thackeray
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? जातीयवाद मी केला असेल तर मला एक उदाहरण दाखवा. माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होतं. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला प्रोत्साहन दिलं. त्यावेळी आमच्या पक्षामध्ये विधीमंडळात नेतृत्व करायची निवड करायची आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडलं तेदेखील बघा. मधुकर पिचड यांना नेता बनवलं. छगन भुजबळ यांना नेता बनवलं. मी २५ लोकांची यादी देऊ शकतो की जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहीत नाही. काहीही ठोकून द्यायचं. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटतं की काहीतरी असावं बाबा. त्यामुळेच राज ठाकरे आरोप करत असावेत असं शरद पवार म्हणाले. साम मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली.

हे पण वाचा- “शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…

पगडीच्या आरोपांबाबत काय म्हणाले शरद पवार?

यापुढे शरद पवार म्हणाले, “पुणेरी पगडीबाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मलाही घालण्यात आली. मी जरी म्हटलं की ही टोपी घाला, फुले पगडी वापरा त्याचा आनंद आहे तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. आमच्यासाठी महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगिकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसं काय म्हणायचं? याला काही फारसा अर्थ नाही.” असंही शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

विरोधी पक्षाला कमकुवत केलं तर त्यात काय चुकलं?

शिवसेना शरद पवारांनीच फोडली हा आरोप भुजबळ माझ्यावर करतात, मी कुठल्या पक्षात होतो? मी काही शिवसेनेत नव्हतो. माझी जबाबदारी काय ? आमच्या विरोधी पक्षाला शक्ती देणार की कमकुवत करणार? जर काम करायचं असेल तर असे आघात होतातच. छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी अस्वस्थ आहेत, संपर्कस साधू इच्छितात तेव्हा आम्ही संपर्क साधला त्यात काही चुकीचं नाही. असंही शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.