मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या महिन्याभरात राज्यभर चर्चेचा विषय ठरला. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांनुसार निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत घेतली आहे. मात्र, त्याचवेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे. तिकडे धनगर समाजानंही आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

Supreme Court on Creamy Layer
“…त्यांना आता आरक्षणाबाहेर ठेवायला हवं”, सर्वोच्च न्यायालयाचं रोखठोक मत; म्हणाले, “७५ वर्षांपासून…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
entrance gate veer Savarkar Name
संमेलनाच्या प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव! साहित्यप्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत

काय म्हणाले शरद पवार?

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध समुदायांकडून आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचा मुद्दा पत्रकारांनी शरद पवारांसमोर उपस्थित केला. त्यावर शरद पवार म्हणाले, “लोकांची आरक्षणाची मागणी आहे. त्यासाठी उपोषण केलं गेलं. राज्य सरकारने त्यांना मुदत वाढवून दिली आहे. प्रश्न सोडवण्याचा विश्वास दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळतं, त्यांच्यातला वाटा अन्य कुणी घेऊ नये अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“चंद्रशेखर बावनकुळेंचं ते वक्तव्य म्हणजे…”, शरद पवारांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “जे अशी भूमिका घेतात…!”

“दुसऱ्या कोट्यातून आरक्षण दिलं जाणार नाही या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा विश्वासही शिंदे सरकारनं दिला आहे. आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतं, हे पुढच्या ३०-३५ दिवसांत दिसेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे आज सांगता येत नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद?

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सध्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केल्याचं शरद पवार म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य, “४० दिवसांचा वेळ सरकारला दिला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय….”

“निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा रस नाही, अशांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मध्य प्रदेश, राजस्थान यासह चार राज्यांमधल्या निवडणुका सध्या महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अद्याप ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मी मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. हे येत्या ८-१० दिवसांत होईल असा अंदाज आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Story img Loader