साने गुरुजी हे महात्मा गांधी यांच्या विचारांचे द्योतक होते. त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभारले. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जनतेच्या कल्याणासाठी काम केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी साने गुरुजींचे स्मरण केले. ते पंढरपूर येथील साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा आणि संत तनपुरे बाबा यांच्या ३७ व्या पुण्यतिथी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलत होते.
हेही वाचा >>> ‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका
यावेळी शरद पवार यांच्याहस्ते साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना “साने गुरुजी हे महात्मा गांधी यांच्या विचाराचे द्योतक होते. सामान्य माणसांमध्ये ते संतांचा विचार अखंडपणे मांडत होते. नव्या पिढीच्या अंत:करणात हा विचार ते सातत्याने रुजवत होते. त्यांच्या आयुष्यात एकदा सत्याग्रह करण्याचा प्रसंग आला होता. पांडुरंगाच्या मंदिरात अस्पृश मानल्या जाणाऱ्या घटकांना प्रवेश नव्हता. पण स्वातंत्र्याचा काळ जसा-जसा जवळ येऊ लागला, तसे या मंदिर प्रवेशाची चर्चा होऊ लागली. पंढरपूरच्या काही लोकांनी मंदिरात अस्पृशांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला होता. त्यांच्या सोबतीला काही सनातनी मंडळी होते. अशा वेळी स्वत: ब्राह्मण समाजात जन्माली असली तर एक व्यक्ती अस्पृशांच्या मानवी हक्कांसाठी सनातनी व्यवस्थेच्या विरोधात मजबुतीने उभी ठाकली. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून मोठे आंदोलन उभे केले. जानेवारी १९४७ ते मे १९४७ या काळात त्यांनी हे आंदोलन उभारले होते,” असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…”
“अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशवरून तत्कालीन सरकारने कायदा करण्याचे ठरवले. पण कायदा होईल. मात्र मनोवृत्तीमध्ये बदल होणे गरजेचे आहे. ती क्रांती अद्याप झालेली नाही. पंढरपूरचे मंदिर मोकळे व्हावे. पांडुरंगाच्या पायी सर्वांना डोके ठेवता यावे, म्हणून मी येथे उपोषणाला बसलो आहे, असे साने गुरजींनी सांगितले होते. पांडुरंग मंदिराच्या व्यवस्थापकांनी देवाजवळ सर्वांना येऊ द्यावे, अशी घोषणा करावी. जोपर्यंत ही घोषणा होत नाही, तोपर्यंत माझा उपवास हा चालू राहील, असे साने गुरूजी म्हणाले होते. एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला होता. तर दुसरीकडे साने गुरुजींचे उपोषण सुरू होते,” असेदेखील पवार यांनी साने गुरुजींच्या उपोषणाबद्दल सांगितले.
हेही वाचा >>> हर हर महादेव चित्रपट विरोध : जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला कलाटणी देणारी ऐतिहासिक घटना म्हणून साने गुरुजींनी केलेल्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा उल्लेख केला जातो. साने गुरुजींनी या सत्याग्रहाचा प्रचार करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र कलापथकाला सोबत घेतले होते. राष्ट्र सेवा दलाच्या मदतीमुळे हा लढा महाराष्ट्रभर पोहोचला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रह घटनेला या वर्षी ७५ वर्षा पूर्ण झाली आहेत.