शिव्या देण्यात आम्ही पीएचडी केलीये. तुम्हाला कोल्हापुरी हव्या असतील, तर कोल्हापुरी देऊ, सोलापुरी हव्या असतील, तर सोलापुरी देऊ, नगरी हव्या असतील, तर नगरी देऊ, हे वक्तव्य केले आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी.
सांगोल्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी आक्रमक रूप घेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. शिवराळ भाषेतच बोलायचे असेल, तर शिमगा हाच राष्ट्रीय सण म्हणून साजरा करा, असाही टोला पवार यांनी लगावला. माढा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील आणि महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात कडवी लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी परस्परांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली जात आहे. या सर्वामध्ये शरद पवार यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर कडव्या शब्दांत प्रहार केला आहे.

Story img Loader