लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : ऊस आळसाचे पीक. एकदा लागवड करायची, मग कारखान्याला पाठवतानाच लक्ष द्यायचे. एरवी जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसायचे. यामुळे शेताचा पोत बिघडतो, क्षारपड होते, याकडे लक्ष देण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कवठेएकंद (ता. तासगाव) येथे केले.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना ते बोलत होते. यावेळी आ. सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी खा.पवार म्हणाले, एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखानाला घालवायलाच शेतकरी उसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतोल.पण शेतीच्या गुणवत्ता कडे लक्ष देत नाही. शेतीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीतचा पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे.
सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता पंप बंद करायला कोण जाईल काय? सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.