Sharad Pawar : शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसंच १९७८ पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने २० फूट गाडलं अशी टीका केली होती. आज या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

आजवर देशात अनेक दिग्गज नेते होऊन गेले कुणालाही तडीपार केलं नव्हतं, शरद पवारांचा टोला

देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. आपल्या शेजारचं राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचं वैशिष्ट्य होतं, की यापैकी कुणालाही तडीपार केलं गेलं नाही. आज त्या नेत्यांची मला आठवण होते आहे असं शरद पवार म्हणाले.

Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

१९७८ च्या सरकारबाबत त्या गृहस्थांनी थोडीफार माहिती घ्यायला हवी होती-शरद पवार

देशाच्या गृहमंत्र्यांनी शिर्डीत भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शाह यांनी माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शाह नक्की कुठे माहीत नाही. १९७८ मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू आडवाणी असे जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते असा टोला शरद पवार यांनी लगावला.

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी

आणखी दोन नावं मी घेऊ इच्छितो, त्यांनी संघाची पार्श्वभूमी असताना आम्हाला सहकार्य केलं. त्यात वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख मी करु इच्छितो. ही सगळी नेतृत्वाची फळी १९७८ आणि त्यानंतरच्या काळात दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगळे होते पण दोन वेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची नावं घेता येतील. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात भूकंप, अतिवृष्टी या संकटांमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी आपात्कालीन स्थितीत काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी माझं नाव आपात्कालीन स्थितीत काय करता येईल याबाबत शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं सुचवलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षाचा असताना मंत्र्याचा दर्जा देऊन मला ते काम सोपवलं होतं. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहीत नसावं. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे उल्लेख झाले त्याबाबत एक मराठीत म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवते असं म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.

टीका करण्याची पातळी किती घसरली हे…

उद्धव ठाकरेंबाबतही त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही पाहिलं. उद्धव ठाकरे हे त्याबाबत त्यांचं मत मांडतील. हे गृहस्थ जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा मुंबईत आले, बाळासाहेबांच्या घरी ते गेले होते. या गृहस्थांना सहकार्य करावं अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. यापेक्षा अधिकची माहिती उद्धव ठाकरे सांगतील असाही टोला शरद पवार यांनी लगावला. दुर्दैवाने पातळी घसरली किती ते सांगायला ही उदाहरणं पुरेशी आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्यांची नोंद त्यांच्या पक्षातही घेतली जाणार नाही असं मला वाटतं असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

Story img Loader