मदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकास्र डागलं आहे. विदर्भात पक्ष वाढवण्यासाठी ज्या व्यकीला ताकद दिली होती. त्यांच्याच भागात राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली, अशी टीका रोहित पवार यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले, “शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, असं काहीजण म्हणतात. केंद्रात सत्ता आल्यावर प्रफुल्ल पटेलांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. राज्यात मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं, तरी अनेक मंत्रीपदे आपल्या पक्षाला मिळाली होती.”

हेही वाचा : “एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

“जे भाजपाबरोबर गेलेत, त्यांनाच मंत्रीपद मिळाली होती. सर्व नेत्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून पक्षानं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं. हेच लोक आज मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याचं सांगतात, म्हणजे चेस्टा केल्यासारखं आहे. विदर्भात पक्ष वाढण्यासाठी ज्या व्यक्तीला ताकद दिली होती. त्यांच्याच भागात पक्षाला यश मिळालं नाही. त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल कमी पडल्याचं सांगत आहेत,” असा टोला रोहित पवारांनी लगावला.

हेही वाचा : ‘इंडिया’द्वारे एकजूट दाखवण्याचा प्रयत्न, पण विरोधकांमध्ये मतैक्य नाही

“प्रफुल्ल पटेलांनी पुस्तक लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. पटेल पुस्तकात काय-काय लिहितात, हे बघावं लागणार आहे. शरद पवारांनी विश्वास कसा ठेवला आणि पक्षाचं नुकसान झालं की फायदा झाला, हे पटेलांनी पुस्तकात लिहावे,” असेही रोहित पवारांनी म्हटलं.