खटाव तालुक्यातील एनकूळ गाव खासदार शरद पवार दत्तक घेणार आहेत. गावासाठी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एनकूळला भेट दिली.
एनकूळ हे खटाव तालुक्यातील गाव आहे. हे गाव माढा लोकसभा मतदारसंघात येते. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या वेळी येथे लक्षणीय मतदान झाले होते. साहजिकच पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत या अभियानानुसार हे गाव आदर्श करण्यासाठी निवडले. गावच्या विकासासाठी त्यांनी शासकीय अधिका-यांबरोबर चर्चा केली. येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेस मदत करण्याचे ठरवले असून, गावात शास्त्र महाविद्यालय काढण्याचे प्रतिपादन केले. गाव जिरायती आहे. त्यासाठी पाणीपुरवठा कसा करता येईल, सिंचन कसे वाढवता येईल, बंधारे, तलाव काढण्याची चर्चा झाली. राजकीय मतभेद विसरून सगळय़ा गावांनी एकत्र यावे असे आवाहन या वेळी शरद पवार यांनी केले.
एनकूळ गाव घेणार दत्तक
खटाव तालुक्यातील एनकूळ गाव खासदार शरद पवार दत्तक घेणार आहेत. गावासाठी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एनकूळला भेट दिली.

First published on: 17-11-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar will adopt enakula village