Sharad Pawar Worried about Manipur : आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात देशाला देशा दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे. परंतु, आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जात पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असं मला वाटतं

शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं अंसं वाटलं नाही. ते तिकडे गेले नाहीत. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य किंवा शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. तर ते रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं गेलं. राज्यातील सर्वसामान्यांचं हे राज्य आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून हेच सूत्र आपल्यासमोर मांडलं आहे. आपण त्याचं पालन करण्याची गरज आहे.

Sharad Pawars empire, Net Worth, Property and Investmen
शरद पवार

हे ही वाचा >> Anil Deshmukh on Samit Kadam: “समीत कदमच्या पत्नीने देवेंद्र फडणवीसांना राखी बांधलीये”, अनिल देशमुखांचा पुन्हा आरोप; म्हणाले, “त्याला वाय दर्जाची सुरक्षा…”

एकसंघ समाज घडवायला हवा : शरद पवार

पवार म्हणाले, शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांमुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे. परंतु, अलीकडच्या काळात इथली परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यात आता बदल करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला तो बदल करायचा असेल तर जात, पंथ, धर्म व भाषा या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र यायला हवं. एकसंघ समाज व एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन आपल्याला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. माझ्या मते ही ऐक्य परिषद यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावू शकते.