राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात शरद पवारांचे खास मित्र विठ्ठल मणियार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – VIDEO: “शरद पवारांचा राजीनामा हा मास्टर स्ट्रोक, कारण…”, मनसेचे आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

काय म्हणाले विठ्ठल मणियार?

“शरद पवारांनी घेतलेला निर्णय धक्कादायक वाटणं स्वाभाविक आहे. कारण एखादी अनपेक्षित घडली की ती आपल्याला धक्कादायक वाटते. मात्र, त्यांनी घेतलेला निर्णय अचानकपणे घेतला, असं वाटत नाही. या निर्णयाचा परिणाम पक्षसंघटनेवर आणि इतर अनेक गोष्टींवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे विचार करूनच हा निर्णय घेतला असावा”, अशी प्रतिक्रिया विठ्ठल मणियार यांनी दिली.

हेही वाचा – उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे बारसू रिफायनरीच्या मुद्यावर घूमजाव, म्हणाले…

दरम्यान, शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आता कायकर्त्यांकडून करण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी भाष्य केलं. “कार्यकर्त्यांची मागणी ही स्वाभाविक आहे. मात्र, या निर्णयामागे शरद पवारांचा काही महत्त्वाचा उद्देश असेल ते निर्णय मागे घेतील असं वाटत नाही. शेवटी कार्यकर्त्यांना मनावर दगड ठेऊन हा निर्णय मान्य करावा लागेल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार की सुप्रिया सुळे? संजय शिरसाट म्हणाले, “आजची परिस्थिती बघता…”

शरद पवारांनी दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

काल शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे या अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. आता राज्यसभेच्या सदस्यत्वाची ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा प्रयत्न असेल, १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे.”

Story img Loader