राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाजूला होऊन स्वतःचा वेगळा गट स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. तुमचे वय झाले असून तुम्ही बाजूला होऊन तरूणांना संधी द्यावी, असे अजित पवार यांचे म्हणणे होते. अजित पवार यांच्या टीकेला शरद पवार गटातील नेत्यांनी अनेकदा उत्तर दिलेले आहे. मात्र आता सोलापूर येथे माध्यमांशी बोलत असताना खुद्द शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. आज सोलापूर दौऱ्यावर आले असताना शरद पवार यांनी काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर टीका केली. तसेच ईडीकडून रोहित पवारांना दिलेल्या नोटिशीवरही आपली प्रतिक्रिया दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांपासून बाजूला नेले
सोलापूरजवळ कुंभारी येथे ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सोलापूर येथे संपन्न झाले. घरांच्या हस्तांतरणप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले. ‘‘ही घरे जेव्हा मी पाहत होतो, तेव्हा आपल्यालाही लहानपणी राहायला असे एखादे घर मिळाले असते तर..’’ हे वाक्य उच्चारताना त्यांचे मन हळवे झाले. गळा दाटून आला. काही वेळ ते नि:शब्द झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीवर शरद पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगारी, महागाई या दोन प्रश्नांचा कुठेतरी ओझरता उल्लेख केला असता, तर अधिक बरं झालं असतं. पण मुळ प्रश्नावरून लोकांना बाजूला नेण्याची कामगिरी त्यांनी केल्याचे दिसून आले.
हे वाचा >> गरिबांच्या स्वप्नपूर्तीची हमी! सोलापुरातील गृहवितरण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
आडाम यांचे कौतुक करायला हवे होते
सोलापुरात असंघटित कामगारांच्या घरांच्या हस्तांतर सोहळ्याचे. या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम यांनी दिलेला होता, तर त्याला प्राधान्याने मूर्त रूप देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या प्रकल्पाचे प्रवर्तक म्हणून आडाम मास्तर यांचेच नाव घेतले जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आडाम मास्तर यांचा उल्लेख केला नसल्याबाबत शरद पवार यांनी नाराजी प्रकट केली. सोलापूरमधील विधायक कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चार चांगले शब्द बोलले असते, तर चांगले झाले असते. निवारा देण्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज होती, अशा शब्दात शरद पवार यांनी आपली खंत बोलून दाखविली.
“सोलापूर जिल्ह्याचे रोजगारासंबंधीचे काही प्रश्न आहेत. औद्योगिकीकरणासाठी इथे प्रयत्न व्हायला पाहीजेत. सोलापूर ही एकेकाळची औद्योगिक नगरी होती. जुन्या काळातील कारखाने बंद पडले. सोलापूरातील ४० ते ५० हजार तरूण आज पुण्यात काम करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांना बाहेर जावे लागत असेल तर त्याबद्दल विचार केला पाहीजे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज होती. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान आले, मुख्यमंत्री आले, पण त्यांच्या येण्याने इथल्या लोकांच्या पदरात काय पडले? हे पाहणे महत्त्वाचे ठरते”, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या वयाची एवढी चर्चा का? राजकारणातील पुढारी निवृत्ती घेतात का?
अजित पवार कुठून आले?
अजित पवार यांनी मागे कर्जत येथील शिबिरात बोलत असताना शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला होता. तसेच तुमचे वय झाले असून तरुणांना संधी द्या, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी हसत हसत याचे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “मी तरुणांना संधी देत नाही. मग अजित पवार कुठून आले आणि त्यांना कुणी आणलं. त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं आणि असं किती लोकांबद्दल सांगू… याकडे फार लक्ष द्यायचं नाही.” मी कधीही हुकूमशहा प्रमाणे वागलो नाही. मी आपसात चर्चा करून निर्णय घेतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.