कर्जत : कारगिल युद्ध.. त्यावेळी देशाच्या सैनिकांनी प्राणपणाने आपल्या सीमांच केलेले संरक्षण.. त्यासाठी दिलेली प्राणांची आहुती.. आणि हुबेहूब हा प्रसंग कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई सभागृह येथे विद्यार्थ्यांनी रंग दे बसंती शोला या कार्यक्रमांतर्गत उभा केला. यामध्ये सैनिक भरतीपासून शस्त्रास्त्र लढायची दृश्य सैनिकांची सुट्टी आपत्ती काळातील सैनिकांची होणारी अडचण देशभक्ती घरातील लहान मुलांची भावनिक व वैचारिक समस्या. युद्धामध्ये सैनिकाचा सहभाग, सैनिकांची कर्तव्य तसेच युद्धामध्ये देश संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांची भूमिका व बटालियनकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना कळविलेला मेसेज, शहीद जवानांची शवपेटी घरी आल्यानंतर त्याच्या घरच्यांचा झालेला आक्रोश, लहान मुलांनी फोडलेला टाव्हो हा संवाद व दृश्य पाहून शारदाबाई पवार सभागृहामध्ये बसलेल्या पाहुण्यांपासून प्राचार्य व विद्यार्थी विद्यार्थिनींचे डोळे पाणावले व अश्रू अनावर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम “रंग दे बसंती शौला” ही होती यावरच आधारित मेजर डॉ. संजय चौधरी व प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल युद्धावर एक स्वतंत्र कार्यक्रम बसवण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण युद्धाची थरार दृश्ये एवढी हुबेहूब उभी करण्यात आली होती. हे सर्व पाहून प्रत्यक्षात युद्धभूमीवर सुरू असलेले युद्ध. आणि त्या ठिकाणचा सर्व थरार उपस्थित हजारो विद्यार्थी प्रेक्षक नागरीक यांनी अनुभवला.

या कार्यक्रमांमध्ये छोट्या सैनिकाची भूमिका संस्कार तोडमल या विद्यार्थ्याने केली. त्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. त्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अभियानाबद्दल व कार्यक्रम व्यवस्थित सादरीकरण केल्याबद्दल मेजर डॉ. संजय चौधरी, जी सी आय प्राजक्ता पठाडे यांचा राजेंद्र फाळके व प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के, राम काळे, प्रा. प्रतिमा पवार यांनी केले.

या कार्यक्रमाला डॉ. संजय नगरकर, राजेंद्र फाळके, अन्य माजी विद्यार्थी, विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्याचे काम जी सी आय प्राजक्ता पठाडे यांनी केले. या थीमची मूळ संकल्पना मेजर डॉ. संजय चौधरी यांची होती. या कार्यक्रमकरिता अंडर ऑफिसर निलेश लाडघुले, कुमार पठाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाबद्दल सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. कोल्हे, आदींनी छात्र सैनिकांचे अभिनंदन केले आहे.