सातारा : शरद पवार यांनी स्व.अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला नाही. मी स्वतः त्यांच्याबरोबर सह्याद्रीवर गेलो होतो. त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत पुढाकार घेतला असता तर ते जिल्ह्याचे व राज्याचे नेते झाले असते. ग्रामविकासमंत्र्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सोळशी धरणाचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी त्यांना आमची साथ असेल, अशी ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील मंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होईल, असे काम होईल.जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग भरून निघेल,अशी अपेक्षा आहे.जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात २७ रोजी राष्ट्रवादीच्या वतीने मोटारसायकल रॅलीद्वारे निवेदन दिले जाणार आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास मोर्चा काढण्यात येणार आहे. चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवला जाणार आहे.

हेही वाचा >>>Rajeshwar Chavan : संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हाध्यक्षांची सीआयडी चौकशी; म्हणाले, “राजकारणात…”

खा. शरद पवार यांच्याकडून स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाला आहे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे. त्यावर बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘त्या काळात सातारा जिल्हा संपूर्ण काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. परंतु, जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय शरद पवार यांनी निर्णय घेतला नाही. अभयसिंहराजे जिल्ह्याचे व राज्याचे नेते व्हावेत, ही इच्छा होती. यासाठी सह्याद्रीवर अभयसिंहराजेंना घेऊन गेलो. या वेळी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्याचे ठरले. सातारा जिल्हा बँक त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ताब्यात यावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु, त्यांनी पुढाकार घेतला नाही. त्यांनी पुढाकार घेतला असता, तर जिल्हा व राज्याचे नेते झाले असते. शिवेंद्रराजे स्वतः निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय व्हायला लागले म्हणून ते या पदापर्यंत पोहचले. शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला नाही. त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतले. जयकुमार गोरे यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली, यावर बोलताना आ. शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यात पाण्याचा साठा किती आहे व त्याचे वाटप कशा पद्धतीने केले जाणार हे त्यांनी सांगावे. आता सरकार तुमचे असून ‘सुप्रमा’ मंजूर झाली आहे, असे सांगता तर मग नवीन सोळशी धरण करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी. तरच जिल्हा दुष्काळमुक्त होईल. जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी आम्ही चर्चा करायला तयार आहे.’

Story img Loader