मुरूड- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा नुकताच मुरुड येथे पार पडला. या मेळाव्यात शेकापच्या जयंत पाटील यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या पार पडलेल्या निवडणुकीत शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांच्या पराभवाचे विवेचन करत असताना सुनील तटकरे हे अजित पवारांची दुसरी बायको आहे, असे धक्कादायक विधान आमदार जयंत पाटील यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार आणि माजी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार पंडीत पाटील उपस्थित होते. मुरूड तालुक्यातील शेकापचे नेते मनोज भगत आणि इतर कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने मुरुड येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.

हेही वाचा – नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांचा भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पराभव केला. हा पराभव शेकापच्या जिव्हारी लागला. या पराभवाचे विश्लेषण करत असताना, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित मदत झाली नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – ६३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विकासकांकडूनही खरेदी!

हेही वाचा – “वंचितच्या पाठित खंजीर खुपसलात’, प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला; मविआतल्या अंतर्गत बाबी जाहीर करत म्हणाले…

अतिशय शेलक्या शब्दांत त्यांनी यावेळी सुनील तटकरेंना लक्ष केले. अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांचा राजकीय बदला घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. जिल्ह्यात शेकापची आजही पाच लाख मते आहेत. नेते सोडून गेले तरी मते कायम आहेत. त्यामुळे येत्या काळात पक्षाची ताकद आम्ही दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader