नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा आíथक कोंडमारा दूर करण्यासाठी व त्यांच्याप्रत सहवेदना व्यक्त करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाच्या मदतीने ७० विद्यार्थी आणि पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांच्या मदतीचा हात देण्यात आला.
शेतकरी कामगार पक्ष आणि उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरातील मेघमल्हार सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आíथक मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकापचे आमदार विवेक पाटील, रायगडचे माजी जि. प. अध्यक्ष बाळाराम पाटील, प्रकाश म्हात्रे, मल्लीनाथ गायकवाड, सचिन तडफळे, प्रा. अमोल दीक्षित, किरण खपले, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबासाहेब माणिक जगताप (रूईभर), तानाजी एकनाथ कदम (पांगरवाडी), त्र्यंबक सोपान चव्हाण (चव्हाणवाडी), बालाजी सुबराव बागल (िशगोली), शंकर रामा लांडगे (मेंढा) व बापू दगडू गायकवाड (सरमकुंडी) या शेतकऱ्याच्या विधवा पत्नींना मदतीचे धनादेश दिले. तसेच शेकापने ५० मुलांचे तीन वर्षांंकरिता पालकत्व स्वीकारले. त्यापकी ८ मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात आज मदत दिली. विधवा पत्नींना ३० हजार रोख, ७० हजार रुपयांची बँक मुदत ठेव, आई-वडिलांना प्रत्येकी १० हजारांची मदत व मुलांना शिक्षणासाठी ५ व १० हजार रुपये रोख, असे मदतीचे स्वरूप होते.
पनवेलचे भाई बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकापने हा उपक्रम राबविला. यावेळी बोलताना शेकापचे विवेक पाटील यांनी, शेकाप लहान पक्ष असला तरी ती एक सामाजिक चळवळ आहे व आम्ही कायम बळीराजासोबत आहोत. त्यांचे दुख कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले. सरकार कुठलेही असो, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी आम्ही पारनेरमध्ये काम केले. यावेळी तुळजापूर व उस्मानाबाद येथे काम करणार आहोत. यासाठी पत्रकार संघाने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. ज्या विधवा भगिनी अथवा मुले व्यवसाय करू इच्छितात त्यांनाही यापुढे व्यवसायासाठी मदत केली जाईल. मुलींच्या लग्नामुळेही शेतकऱ्याचे कर्जबाजारीपण वाढते. हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळाही आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळावर कायम उपाययोजनासाठी जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेऊन तेथे जलसंधारणाची कामे केली जातील, असेही त्यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा