शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे भाजपात आले आहेत. त्यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसंच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते जनतेत राहून जनतेची कामं करणं यासंदर्भातलं त्यांचं सातत्य महत्त्वाचं आहे. धैर्यशील पाटील भाजपात असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला आनंद होतो आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. धैर्यशील पाटील हे फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे नाहीत. तर समाजाचं हित समोर ठेवून राजकारण करणारे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपले प्रश्न धडाडीने धैर्यशील पाटील मांडत असत. धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं. तळगाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे. आज देशाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचं नेतृत्त्वही असाच विचार करणारं आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होमार आहेत. त्याआधी महाविकास आघाडीला जितकं कमकुवत करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. महाविकास आघाडीचे आजी-माजी आमदार आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करते आहे. आज शेकापच्या धैर्यशील पाटील यांनी केलेला प्रवेश हेच सांगून जातो आहे. मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा गमछा धैर्यशील पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतला. रायगड पालीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता धैर्यशील पाटील हे देखील भाजपात आले आहेत. त्यामुळे रायगडमधला शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shetkari kamgar paksh former mla dhairyashil patil now in bjp scj